वाराणसीत 'हर हर मोदी, घर घर मोदी'चा नारा

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

वाराणसी (उत्तर प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात आज आयोजित करण्यात आलेल्या "रोड शो'च्या निमित्ताने "हर हर मोदी, घर घर मोदी' चा नारा उमटला. मोदी यांचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले.

मोदी आज हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरमधून वाराणसीत दाखल झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अन्य काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठात गेले. त्यानंतर त्यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या वाराणसी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

मोदींच्या "रोड शो'साठी हजारोंचा जमाव
बुलेटप्रुफ मोटारीने गेस्ट हाऊसपासून मोदी यांच्या रोड शोला प्रारंभ झाला. त्यानंतर रविदास गेट लंका, असी, मदानी, सोनारपूरा, गोदोलिया आणि बसपाठक परिसरातून मोदी यांचा रोड शो काशी विश्‍वनाथ मंदिरापर्यंत पोचला. या संपूर्ण परिसरात रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने जमाव उपस्थित होता. जमावाने "हर हर मोदी, घर घर मोदी' असा नारा दिला.

भाजप-समाजवादी कार्यकर्त्यात किरकोळ मारामारी
बनारस हिंदू विद्यापीठाच्या सिंहद्वाराजवळ मोदी यांचा रोड शो सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी झाली.

Web Title: PM Narendra Modi's road show in Waranasi