लष्कर उठाव करणार नाही : मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

भारतामध्ये लष्कर कधीच उठाव करणार नाही, व्ही. के. सिंग यांच्याकडे लष्कराचे नेतृत्व असताना 2011-12मध्ये या संदर्भात जाणीवपूर्वक खोट्या बातम्या प्रसृत करण्यात आल्या होत्या, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

तिरूपूर (तमिळनाडू) : भारतामध्ये लष्कर कधीच उठाव करणार नाही, व्ही. के. सिंग यांच्याकडे लष्कराचे नेतृत्व असताना 2011-12मध्ये या संदर्भात जाणीवपूर्वक खोट्या बातम्या प्रसृत करण्यात आल्या होत्या, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

"काही दिवसांपूर्वी तत्कालीन "यूपीए' सरकारमधील एक मंत्री लष्कर कधीही उठाव करू शकते, असा दावा करत होते. यावर देशाने नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की आमचे लष्कर अशाप्रकारचे कृत्य करू शकत नाही; पण या संदर्भात कॉंग्रेसची वृत्ती तरी पाहा,'' असा टोला मोदींनी लगावला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहीत लष्कराच्या कथित उठावाबाबत प्रसिद्ध झालेल्या "त्या' वृत्ताची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

Web Title: PM Narendra Modis Statement About Defense Uthav