'पीएम तो पढा लिखा ही होना चाहिए' : केजरीवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

अजूनही लोक मनमोहनसिंगांची आठवण काढतात, असे केजरीवालांना या ट्विटद्वारे म्हणायचे आहे. तसेच 'पीएम तो पढा-लिखा होना चाहीए' असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हणले आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी (ता. 31) पुन्हा मोदींवर निशाण साधत ट्विट केले. 'जनता डॉ. मनमनोहम सिंगांसारख्या शिक्षीत पंतप्रधानांपासून वंचित आहेत, असे म्हणत त्यांनी मनमोहन सिंग यांची प्रशंसा केली. अजूनही लोक मनमोहनसिंगांची आठवण काढतात, असे केजरीवालांना या ट्विटद्वारे म्हणायचे आहे. तसेच 'पीएम तो पढा-लिखा होना चाहीए' असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हणले आहे. 

भारतीय चलन - रूपयाच्या घसरण्यावरून केजरीवाल यांनी मोदींवर टिका केली. 2011 मध्ये केजरीवालांनी अण्णा हजारेंसोबत मनमोहनसिंग सरकार विरोधात भ्रष्टाचारविरोधीत जनआंदोलनात सहभाग घेतला होता. आता तेच केजरीवाल मनमोहनसिंगांचे कौतुक करताना व मोदींना विरोध करताना दिसत आहेत. 'वॉल स्ट्रीट जनरल'चा अहवाल सादर करत केजरीवालांनी रूपयाची घसरण कशी झाली आहे, हे ही या ट्विटमध्ये सांगितले आहे. आशियातील मोठ्या प्रमाणात घसरण झालेले चलन हे रूपया हे असून, यामुळे भविष्यात भारतात गुंतवणूक करणे अनिश्चत असेल, असे या अहवालात म्हणले आहे.

या नंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत भाजप हे दिल्लीच्या राजकारणात अत्यंय हीन दर्जाचे राजकारण करत आहे, असे सांगितले. हरयाणातून दिल्लीला येणारे पाणी कमी करून हरयाणा सरकार हे दिल्लीत वाईट प्रकारचे राजकारण करत आहेत, अशी टिका केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केली.     

Web Title: pm should be educated said by arvind kejariwal