esakal | आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, नाहीतर...; पंतप्रधान मोदींचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi12

भारताला आजमावून पाहण्याचा प्रयत्न केल्यास ‘मुहंतोड जबाब ’मिळेल, असा इशारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे चीन आणि पाकिस्तानला आज दिला.

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, नाहीतर...; पंतप्रधान मोदींचा इशारा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लोगोंवाला (राजस्थान)- भारताला आजमावून पाहण्याचा प्रयत्न केल्यास ‘मुहंतोड जबाब ’मिळेल, असा इशारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे चीन आणि पाकिस्तानला आज दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याहीवर्षी दिवाळी जवानांसमवेत साजरी केली. राजस्थानच्या लोगोंवाला चौकी येथे जवानांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून दरवर्षी दिवाळी सीमेवर आघाडीच्या चौकीवर साजरी करतात. गेल्यावर्षी ते राजौरीत गेले होते. तत्पूर्वी २०१८ मध्ये उत्तराखंड येथे तर २०१७ रोजी गुरेज सेक्टरला भेट दिली होती. मोदी म्हणाले की, भारतमातेच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी चोवीस तास दक्ष राहणाऱ्या सर्व जवानांना माझ्याकडून आणि देशातील १३० कोटी जनतेकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यामुळेच देश आहे, आनंद आणि उत्सव आहे. आपण बर्फाच्छादित प्रदेशात असाल किंवा वाळवंटात असाल, माझी दिवाळी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. आपल्या चेहऱ्यावरील आनंद आणि रौनक पाहून माझा आनंद द्विगुणित होतो. आपल्या धाडसाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे मुंबईत निधन; PM मोदींवर लिहिलं होतं पुस्तक

आपल्या भाषणात चीनचे नाव न घेताना मोदी म्हणाले, आज संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींनी त्रस्त झाले आहे. विस्तारवाद हा एक प्रकारचा मानसिक आजार असून ते १८ व्या शतकातील विचारांचे द्योतक आहे. भारताची भूमिका ही नेहमीच समजूतदारपणाची राहिली असून परस्पर सामंजस्याने धोरण आखण्यावरच भारत विश्‍वास ठेवतो. मात्र आपल्याला कोणी आजमावून पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. जगातील कोणतीही शक्ती आमच्या साहसी जवानांना सीमांचे रक्षण करण्यापासून रोखू शकत नाही. देशांच्या सीमांना आव्हान देणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचे धाडस आणि राजकीय इच्छा देखील आपल्याकडे आहे आणि हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. भारत कधीही देशहिताशी तडजोड करत नाही हे देखील जगाने ओळखले आहे.

जवानांना उद्देशून बोलताना मोदी म्हणाले, की आपल्यासमवेत अधिकाधिक काळ व्यतीत केल्याने माझा देशाची सेवा आणि संरक्षणाचा संकल्प अधिकच दृढ होत जातो. यावेळी पंतप्रधानांनी जवानाकडे तीन गोष्टींचा आग्रह केला. ते म्हणाले की, दररोज काहींना काहीतरी नवीन शोधण्याची सवय लावून घ्या, दुसरे म्हणजे योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक करा आणि तिसरे म्हणजे आपली मातृभाषा, हिंदी इंग्रजी आणि याव्यतिरिक्त आणखी एक भाषा शिका. या गोष्टी आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवतील. यावेळी त्यांनी १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या साहसी पराक्रमाला अभिवादन केले. १९७१ चे युद्ध हे लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील समन्वय आदर्श होता, असेही मोदी म्हणाले.

तरुणांनी लष्करासाठी पुढे यावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना लष्करासाठी नव्याने संशोधन करण्याचे आवाहन केले. अलीकडच्या काळात अनेक स्टार्टअप्स कंपन्या लष्कराची गरज भागवण्यासाठी पुढे आले आहेत. संरक्षण क्षेत्रात तरुणांनी सुरू केलेले नवीन स्टार्टअप्स हे देशाला आत्मनिर्भर करण्यास उपयुक्त ठरत आहेत, असे मोदी