"पीएमओ'चे ट्‌विट वादात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

 राज्यघटनेतील राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील "कलम-356' वरून पंतप्रधान कार्यालयाच्या ट्‌विटर हॅंडलवरून करण्यात आलेले ट्‌विट वादाच्या भोवऱ्यात सापडले.

नवी दिल्ली - राज्यघटनेतील राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील "कलम-356' वरून पंतप्रधान कार्यालयाच्या ट्‌विटर हॅंडलवरून करण्यात आलेले ट्‌विट वादाच्या भोवऱ्यात सापडले. "" कॉंग्रेसने आतापर्यंत अनेकदा कलम-356 चा गैरवापर केला आहे पण मोदी हे घटनात्मक संस्थांनाच नष्ट करत आहेत, '' असे ट्‌विट पंतप्रधान कार्यालयाच्या ट्‌विटर हॅंडलवरून करण्यात आल्याने एकच खळबळ निर्माण झाली.

या ट्‌विटनंतर काही क्षणांमध्ये नेटीझन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला. अनेकांनी "पीएमओ'ची खिल्ली उडविली तर काहींनी भाजपच्या सायबर टीमच्या पात्रतेवरच शंका उपस्थित केली.

Web Title: PMO's tweet controversy