'महात्मा गांधींपेक्षा नरेंद्र मोदी श्रेष्ठ'

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

महात्मा गांधी यांचे नाव खादीशी जोडले गेल्यापासून खादी बुडाल्यात जमा आहे. मोदींमुळे खादीच्या विक्रीत वाढ झाली असून, खादी उद्योगांना 14 टक्के नफा झाला आहे.

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किर्ती मोठी असून, ते श्रेष्ठ आहेत, अशी प्रतिक्रिया हरियानातील मंत्री अनिल विज यांनी दिली आहे.

खादी ग्रामोद्योग विभागाच्या दिनदर्शिकेवरून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे छायाचित्र हटवून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी हरियानातील मंत्री अनिल विज यांनी मोदींची स्तुती करताना हे छायाचित्र योग्यच असल्याचे म्हटले आहे.

विज म्हणाले, की महात्मा गांधी यांचे नाव खादीशी जोडले गेल्यापासून खादी बुडाल्यात जमा आहे. मोदींमुळे खादीच्या विक्रीत वाढ झाली असून, खादी उद्योगांना 14 टक्के नफा झाला आहे. मोदीच खादीचे ब्रँड आहेत. त्यामुळे महात्मा गांधींपेक्षा मोदीच श्रेष्ठ आहेत. लवकरच नोटांवरूनही महात्मा गांधींची प्रतिमा हटविण्यात येईल. 

Web Title: PM's pic on KVIC calendar row: Narendra Modi bigger brand than Mahatma Gandhi, says Anil Vij