चोक्‍सीची "गीतांजली जेम्स' शेअर बाजारातून हद्दपार

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेला मेहूल चोक्‍सी याला शेअर बाजारांनी दणका दिला आहे. तिमाही निकाल जाहीर न केल्यामुळे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) मेहूल चोक्‍सीची मालकी असलेल्या गीतांजली जेम्स या कंपनीच्या शेअरमधील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. 

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेला मेहूल चोक्‍सी याला शेअर बाजारांनी दणका दिला आहे. तिमाही निकाल जाहीर न केल्यामुळे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) मेहूल चोक्‍सीची मालकी असलेल्या गीतांजली जेम्स या कंपनीच्या शेअरमधील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. 

शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांसाठी बाजाराचे काही नियम आहेत. या नियमांची पूर्तता न केल्याने शेअर बाजाराने 9 कंपन्यांवर कारवाई केली आहे. 10 सप्टेंबरपासून या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना व्यवहार करता येणार नाहीत.

"बीएसई" आणि "एनएसई" निर्बंध घातलेल्या कंपन्यांमध्ये गीतांजली जेम्स, ऍम्टेक ऑटो, ईसून रेरोल, पॅनारोमिक युनिव्हर्सल यांचा समावेश आहे. थंबी मॉर्डन स्पिनिंग मिल, इंडो पॅसिफिक प्रोजेक्‍ट्‌स, हरियाणा फायनान्शिअल कॉर्पोरेशन, नोबेल पॉलिमर आणि समृद्धी रियल्टी आदी शेअरमधील व्यवहार रोखण्यात आले आहेत. या कंपन्यांनी डिसेंबर 2017 आणि मार्च 2018 या सलग दोन तिमाहींचे निकाल एक्‍सचेंजला सादर केले नाहीत. 

Web Title: PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares