नीरव मोदीची 26 कोटींची ज्वेलरी जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

नीरव मोदीच्या घरी जाऊन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मौल्यवान ज्वेलरी, महागडी घड्याळे आणि पेंटिंग्स अशी 26 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. 

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील विविध शाखेत 12000 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या गैरव्यवहारप्रकरणी हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गैरव्यवहातील काही रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नीरव मोदीच्या घरी जाऊन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मौल्यवान ज्वेलरी, महागडी घड्याळे आणि पेंटिंग्स अशी 26 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. 

Nirav modi

मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या विविध शाखेत तब्बल 12000 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या गैरव्यवहारात नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संयुक्त कारवाई करत नीरव मोदीच्या मुंबईतील वरळी येथील आलिशान फ्लॅटमध्ये कारवाई केली.

Enforcement directorate

याबाबत सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सीबीआयच्या मदतीने नवी शोधमोहिम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान 15 कोटींची दुर्मिळ ज्वेलरी, 1.4 कोटींचे महागडी घड्याळे, अमृता शेर-गिल, एम. एफ. हुसैन आणि के. के. हेब्बर यांचे 10 कोटींचे पेंटिंग्स् अशी तब्बल 26 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. तसेच यामध्ये 10 कोटींची डायमंड अंगठीही जप्त करण्यात आली. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमपीएमएलए) करण्यात आली. 

Web Title: PNB Scam Jewellery watches paintings worth Rs 26 crore seized from Nirav Modi house