बेकायदा गावठी दारुची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

अमृत वेताळ
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

बेकायदा गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करुन गावठी दारुसह सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (ता.1) मध्यरात्री एकच्या सुमारास मुचंडी (ता. बेळगाव) नजिक अबकारी पोलिसानी केली आहे. दारुची वाहतूक करणारा संशयीत मात्र, फरारी झाला आहे. 

बेळगाव : बेकायदा गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करुन गावठी दारुसह सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (ता.1) मध्यरात्री एकच्या सुमारास मुचंडी (ता. बेळगाव) नजिक अबकारी पोलिसानी केली आहे. दारुची वाहतूक करणारा संशयीत मात्र, फरारी झाला आहे. 

बुड्य्रानुर येथून मुचंडीला मोठ्या प्रमाणात बेकायदा गावठी दारुची वाहतूक करण्यात येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती अबकारी खात्याचे पोलीस उपअधिक्षक विजयकुमार हिरेमठ याना मिळाली होती. त्यानुसार त्यानी आज मध्यरात्री मुचंडी गावापासून दोन कि.मि अंतरावर सापळा रचला होता.

रात्री एकच्या सुमार जी.ए.02 ए. 5423 क्रमांकाची मारुती 800 मोटार येताच तीला अबकारी अधिकाऱ्यांनी रोखले. तेवढ्यात चालकाने काळोखाचा फायदा घेत कार तेथेच सोडून घटनास्थळावरुन पलायन केले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे चोवीस हजार रुपये किमतीचे 240 लिटर गावठी दारु आढळून आली. तसेच एक लाख रुपये किमतीची कार असा एकून सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अबकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसानी फरारी चालकाचा शोध चालविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police Action on illegal smugglers in belgum