मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 जानेवारी 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी आज (बुधवार) पहाटेच ताब्यात घेतले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला होता. एकंदर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे.

सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी आज (बुधवार) पहाटेच ताब्यात घेतले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला होता. एकंदर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मंगळवारपासूनच कडकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. आंदोलन करण्याची शक्‍यता असलेल्या कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह अनेकांना सकाळीच ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांची धरपड सुरु होती. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम मैदानावर हेलीकॉप्टरने आगमन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवरांनी मोदींचे स्वागत केले.

काही वेळातच त्यांच्या वाहनाचा ताफा पार्क स्टेडीअमवर पोचला. विविध विकास कामांच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी 50 मिनिटे भाषण केले. दुपारी 12.50 वाजता मोदींचे भाषण संपले. मोदींसह अन्य व्हीआयपींचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची गर्दी दिसून आली. याच गर्दीतून विविध ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है.., सरकार हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है.. अशी घोषणाबाजी केली. काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Police Beaten Nsui Party Worker Who Shown Black Flag To Pm Modi