
चौघे ताब्यात
प्रियांका रेड्डी यांच्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
हैदराबाद : डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्यात आले. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवालही आला असून, त्यांच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी वाचा ई-सकाळचे एप
प्रियांका रेड्डीचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली. प्रियांका रेड्डीला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री साडेनऊपासून गुरुवारी पहाटे 4 पर्यंत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच या चौघांनी प्रियांकाचा मानसिक, शारीरिक त्रासही दिला, असे या अहवालात म्हटले आहे.
हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या अन् दिल्लीच्या निर्भयाची आठवण!
चौघे ताब्यात
प्रियांका रेड्डी यांच्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. ट्रकचालकासह त्याच्या क्लिनर्सनेही प्रियांकावर बलात्कार करुन तिची हत्या केली.