बेळगाव : काकतीचे पोलीस निरीक्षक निलंबित

अमृत वेताळ
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बेळगाव : काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना निलंबिल करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी हा आदेश जारी केला केला. आठवड्यापूर्वी कुद्रेमानी येथील जुगार अड्ड्यावर पडलेल्या छाप्याचा ते बळी ठरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात असून, पोलीस खात्यात याचे पडसाद उमटत आहेत. 

काकती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील कुद्रेमानी गावानजीक मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू होता. मात्र त्याच्याकडे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने अखेर पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी अलीकडेच पोलीस अधिकाऱ्यास छापा टाकुन 40 जुगाऱ्याना अटक अटक केली होती. यात सुमारे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. या कारवाईमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन पोलीस निरीक्षक गोकाक यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  

आता पीएलडी बँकेच्या निवडणूकीमुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादातून संचालकांची पळवापळवी सुरू झाली आहे. यातून काकती पोलीस ठाण्यात संचालकांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या सर्व कारणामुळे बँकेची निवडणूक पुढे गेली. अपहरण प्रकरणाच्या गुन्ह्यामुळे काँग्रेसच्या एका गटाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणला. त्यामुळे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

याबाबत पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांच्याशी संपर्क साधला असता, कुद्रेमानी येथे जुगाराकडे केलेल्या दुर्लक्षातून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे 'सकाळ' ला सांगितले

Web Title: police inspector of kakati suspended from belgaon