पोलिस-वकील संघर्ष : टाळी एका हाताने वाजत नाही

Laeyers-Agitation
Laeyers-Agitation

नवी दिल्ली - तीस हजारी न्यायालयात गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिस आणि वकिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेला पोलिस आणि वकील हे दोन्ही घटक जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले. टाळी एका हाताने वाजत नाही. समस्या दोन्ही बाजूकडून आहेत, असेही न्यायालयाने शुक्रवारी नमूद केले.

‘आम्ही जास्त काही बोलू इच्छित नाही. काही कारणामुळे आम्ही गप्प आहोत. या घटनेपासून आम्ही एका विशिष्ट प्रकारे काम केले आहे, असे कोणी म्हणू शकत नाही,’’ असेही नमूद करीत दोन दिवसांत या प्रकरणावर पडदा पडायला हवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्री यांना दिले. पोलिसांनी अत्याचार केल्याच्या वकिलांच्या तक्रारीवर न्यायालयाने असहमती दर्शविला. ओडिशातील वकिलांनी केलेल्या संपावर सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील या गंभीर घटनेवर मते व्यक्त केली.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
दिल्ली पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या हाणामारीत उत्तर जिल्हा पोलिस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. न्यायालयाच्या परिसरात काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे. 

तीस हजारी न्यायालयात वकील आणि पोलिसांमधील हिंसाचाराची माहिती मिळताच मोनिका भारद्वाज या पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन न्यायालयात पोचल्या. त्या वकिलांच्या जमावाकडे जात असताना काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलिस आणि काही वकिलांनी त्यांचा जमावापासून बचाव करीत होते, तर काही जण त्यांना पकडण्यासाठी मागे धावत होते. या हल्ल्यात पोलिस स्थानक प्रमुख आणि अन्य पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. हा हल्ला कोणी केला याचा शोध सुरू आहे.

या व्हिडिओप्रमाणेच दोन पोलिसांमधील संवादाची ध्वनिफीतही व्हायरल झाली आहे. मोनिका भारद्वाज यांचा वाचविण्याचा कसा प्रयत्न केला आणि जमावाने कशी मारहाण केली, याबाबत एका पोलिसाने माहिती दिली आहे. या पोलिस कर्मचाऱ्याची सेवा पिस्तूल हिसकावण्याचाही प्रयत्न झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com