खाकी वर्दीतल्या 'त्या' मातेला फुटला मायेचा पाझर

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

हैदराबाद: दोन महिन्यांचं अनाथ बाळ भुकेने व्याकूळ झाल्याने सतत रडत होती... पण, ते बाळ होतं पोलिस चौकीत. एका पोलिसाने आपल्या पत्नीला याबाबतची माहिती दिली. पोलिस असलेल्या या मातेला मायेचा पाझर फुटला. बाळाला स्तनपान केले अन् रुग्णालयात दाखल केले. स्तनपान केलेल्या खाकी वर्दीतल्या आईवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. के. प्रियंका असे स्तनपान करणाऱया मातेचे नाव आहे.

हैदराबादमधील के. प्रियंका या महिला पोलिसाने आपल्या मातृत्वाने अन् दातृत्वाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. बेगमपेठ येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रियंका सध्या बाळंतपणाच्या रजेवर आहेत. मात्र, पोलिस ठाण्यात येऊन खाकी वर्दीमागील मातृत्वाचे दर्शन दिले. प्रियंका यांचा सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल झाले असून, त्यांच्यावर नेटिझन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

येथील उस्मानिया रुग्णालयाजवळ एका महिलेने बाहेर उभा असलेल्या पुरुषाच्या हातात आपले 2 महिन्यांचे बाळ दिले. मी या बाळासाठी पाणी घेऊन येते असे सांगून ती महिला निघून गेली. बराच वेळा झाला तरी संबंधित महिला न आल्यामुळे त्या व्यक्तीने चिमकुल्या बाळासह अफजलगंज पोलिस ठाणे गाठले. अफजलगंज येथे नेमणुकीस असलेले प्रियंकाचे पती के. रविंदर ती चिमुकली भुकेने व्याकूळ असल्याचे ओळखले. या बाळाला आईच्या दुधाची गरज असल्याचे लक्षात आले. रविंदर यांनी पत्नी प्रियंकाला फोन करून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी भुकेने व्याकूळ झालेल्या व रडत असलेल्या लहान अनाथ मुलीला पाहून के. प्रियंका यांनीही तिला जवळ घेतले. चिमुकलीला जवळ घेताच त्यांना मायेचा पाझर फुटला व दूध पाजले. बाळ शांत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, महिला पोलिस के. प्रियांका यांनी खाकी वर्दीतले मातृत्व दाखवल्याबद्दल हैद्राबाद पोलिस आयुक्तांनीही के. प्रियंका व तिचे पोलिस पती एम. रवींदर यांना सन्मानित केले आहे.

Web Title: Police Mom: Hyderabad Cop Breastfeeds 2 Month Old Abandoned Baby