Nikki Yadav Murder Case: निक्की यादव हत्येप्रकरणी मोठा खुलासा; साहिल आणि निक्कीचं अधिच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nikki Yadav Murder Case

Nikki Yadav Murder Case: निक्की यादव हत्येप्रकरणी मोठा खुलासा; साहिल आणि निक्कीचं अधिच...

Nikki Yadav Murder Case: निक्की हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शनिवारी पोलिसांनी एक नवा खुलासा केला की, आरोपी साहिल आणि निक्की यादव यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये नोएडा मधील एका मंदिरात लग्न केले होते.

मात्र साहिलचे कुटुंब या लग्नावर नाराज होते.साहिलच्या कुटुंबीयांनी डिसेंबर 2022 मध्ये त्याचे लग्न ठरवलं होतं मात्र साहिलने आधीच निक्कीशी लग्न केले असल्याचे मुलीच्या कुटुंबापासून लपवून ठेवले होते.

दिल्ली पोलिसांनी निक्की यादव हत्येप्रकरणी मुख्य आरोपी साहिल गेहलोतशिवाय आणखी ५ जणांना अटक केली आहे. गेहलोतच्या वडीलांनी देखील या प्रकरणात मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत माहिती दिली आहे.