Video: युवती छतावर गेली अन् जोरात ओरडली...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जुलै 2020

युवती खिडकीच्या छतावर गेली आणि जोरात ओरडून आत्महत्या करणार असल्याचे बोलू लागली. पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तिचा जीव वाचवला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उज्जैन (मध्य प्रदेश): एक युवती खिडकीच्या छतावर गेली आणि जोरात ओरडून आत्महत्या करणार असल्याचे बोलू लागली. पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तिचा जीव वाचवला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: अपघाताच्या व्हिडिओवर विश्वासच बसत नाही...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवती खिडकीच्या छतावर चढून आत्महत्येची धमकी देत होती. स्वत:चे आयुष्य संपवण्यासाठी ही युवती छतावर चढली. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी बाहेर आले. संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवतीला आत्महत्या करण्यापासून वाचवले. दरम्यान, तरुणीच्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाच्या मदतीने या युवतीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या तरुणीचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police rescued a girl trying to suicide in madhya pradesh video viral