गोव्यामधून 24 लाखांच्या नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पणजी- कलंगुट समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या गावातून 24 लाख रुपयांच्या नवीन नोटा आज (बुधवार) जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कलंगुट समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या स्थानिक नागरिकांच्या मोटारीमधून 24 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नवीन नोटांबद्दल माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.'

दरम्यान, गोवा पोलिसांनी पैसे ताब्यात घेऊन, याबद्दलची माहिती आयकर विभागाला कळविली आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police Seizes Rs. 24 Lakh In New Notes In Goa's Calangute

टॅग्स