हैदराबादमध्ये पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

पीटीआय
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र ही आत्महत्या कौटुंबिक कारणातून झाल्याची माहिती वरिष्ठांनी दिली आहे.

मोदी यांच्या हैदराबाद दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक श्रीधर यांना  बंदोबस्ताची ड्युटी देण्यात आली होती. त्यासाठी ते बुधवारी शहरामध्ये दाखल झाले होते. मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. "त्यांना बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ते ड्युटीवर होते. मात्र आज (शनिवार) सकाळी त्यांनी आत्महत्या केली', अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. व्ही. पद्मजा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

श्रीधर हे 2012 साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रूजू झाले होते. त्यांची नियुक्ती चिंतालामनेपल्ली पोलिस स्थानकात करण्यात आली होती. प्राथमित माहितीनुसार त्यांनी काही कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या केल्याची दिसून येत आहे, असेही पद्मजा यांनी पुढे सांगितले.

Web Title: Police Sub-Inspector commits suicide over family issues