'ठॉय... ठॉय' आवाज काढणाऱया पोलिसाला मिळणार पुरस्कार!

UP police want reward for 'thain thain' cop
UP police want reward for 'thain thain' cop

मेरठ (उत्तर प्रदेश): पोलिस व गुंडांमध्ये सुरू झालेल्या चकमकीदरम्यान ऐनवेळी पोलिस उपनिरीक्षकाचा पिस्तूल लॉक झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस उपनिरीक्षकाने तोंडातून 'ठॉय... ठॉय' आवाज काढत गुंडाचा पाठलाग केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संभलमध्ये 13 ऑक्टोबर रोजी एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. पोलिस उपनिरीक्षकाजवळ असलेला पिस्तूल अचानक लॉक झाला. यामुळे पिस्तूलामधून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत पोलिस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी तोंडातून 'ठॉय... ठॉय' असा फायरिंगचा आवाज काढत गुंडांचा पाठलाग केला. एका पोलिसाने हा व्हिडिओ शूट केला होता. या घटनेचा 13 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलिस आणि गुंडांच्या या चमकीवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने एका गुंडांच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडले. मात्र, अचानक पिस्तूल बंद पडल्यानंतर मनोज कुमार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काढलेल्या आवाजाची सोशल मीडियावर प्रथम थट्टा उडविण्यात आली होती. मात्र, गुन्हेगाराला इशारा देण्यासाठी तोंडातून 'ठॉय... ठॉय' आवाज काढणाऱ्या पोलिस अधिकाऱयाला आता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यामुळे मनोज कुमार यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

पोलिस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितले की, 'पोलिस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी चकमकीदरम्यान बंदूक बंद पडताच प्रसंगावधान राखले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केली जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज कुमार यांच्या सहकाऱ्यांनीदेखील त्यांच्या साहसाचे कौतुक केले आहे. माझे सहकारी पोलिस उपनिरीक्षक यांनी एका हिरोसारखे काम केले आहे. पोलिस दल याकडे सकारात्मकपणे पाहत आहे. पिस्तूल लॉक झाल्यानंतरही आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ न देता त्यांनी तोंडातून 'ठॉय... ठॉय' असा आवाज काढला आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com