श्रीनगरमध्ये चकमकीत एक पोलिस हुतात्मा

पीटीआय
रविवार, 12 ऑगस्ट 2018

बाटमलू भागात आज दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक पोलिस जवान हुतात्मा झाला, तर चार पोलिस जखमी झाले. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शहरातील या भागात पहाटेपासूनच शोधमोहीम सुरू केली होती. या वेळी पाच दहशतवाद्यांच्या गटाने पोलिसांवर गोळीबार आणि बॉंबहल्ला केला.

श्रीनगर : येथील बाटमलू भागात आज दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक पोलिस जवान हुतात्मा झाला, तर चार पोलिस जखमी झाले. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शहरातील या भागात पहाटेपासूनच शोधमोहीम सुरू केली होती. या वेळी पाच दहशतवाद्यांच्या गटाने पोलिसांवर गोळीबार आणि बॉंबहल्ला केला.

या हल्ल्यात कॉन्स्टेबल परवेझ अहमद हे हुतात्मा झाले. पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याच्या प्रयत्नातील पाच दहशतवाद्यांपैकी पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांनी चौकशी दरम्यान बरीच महत्त्वाची माहिती सांगितल्याचेही पोलिसांनी सांगितले. या माहितीनंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविली जात आहे.

Web Title: Policeman Killed As Encounter Breaks Out In Srinagar