बेकायदा शस्त्रकारखान्यावर छापा; शस्त्रास्त्रे जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

शामली (उत्तर प्रदेश) : शामली जिल्ह्यातील कैराना येथील एका बेकायदा शस्त्रकारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून शस्त्रे जप्त केली आहेत.

शामली (उत्तर प्रदेश) : शामली जिल्ह्यातील कैराना येथील एका बेकायदा शस्त्रकारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून शस्त्रे जप्त केली आहेत.

पोलिसांनी या संदर्भात काही माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कैराना येथे छापा टाकला. त्यामध्ये त्यांना दोन मोटारी, 80 पिस्तूल, 123 बंदुका जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य चार जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर असा बेकायदा कारखाना सापडल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सत्ताधारी समाजवादी पक्षात कलहाचे वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

Web Title: Polist bust weapons factory, arrest one with arms and ammunition