कर्नाटकमधील सत्तासंघर्ष अजून बाकी

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

कर्नाटकमधील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेले असताना कर्नाटकमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. येडियुरप्पा  यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी हे फक्त  मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. परंतु, सरकारचं स्वरुप कसे असेल हे अजून स्पष्ट नाही. सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदं मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. 

बंगळूर -  कर्नाटकमधील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेले असताना कर्नाटकमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. येडियुरप्पा  यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी हे फक्त  मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. परंतु, सरकारचं स्वरुप कसे असेल हे अजून स्पष्ट नाही. सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदं मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. 

काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील सरकार स्थापनेचा तिढा कधी सुटणार हे पाहावे लागणार आहे. 'सत्तेचा निर्णय हायकमांड करील' असे काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याने कर्नाटकमधील सत्ता संघर्ष अजून वाढणार असे दिसत आहे. 'आमचा राष्ट्रीय पक्ष असून जेडीएसला आम्ही समर्थन दिलेले आहे. त्याचबरोबर आमची संख्या लक्षात घेता त्याच पद्धतीने आम्हाला सत्तेत वाटा मिळावा', असेही खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

कुमारस्वामी सोमवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करतील.

Web Title: political drama in karnatak