राज्यसभेच्या 25 जागांसाठी मतदान सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, ती निवडणूक बिनविरोध झाल्याने महाराष्ट्रात मतदान घेण्यात येणार नाही.

नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुका देशातील १६ राज्यांमध्ये होणार आहेत. राज्यसभेच्या ५८ जागांपैकी ३३ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २५ जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरु असेल.

राज्यसभेच्या 58 जागांपैकी 25 जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यातील १६ राज्यांपैकी १० राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, ती निवडणूक बिनविरोध झाल्याने महाराष्ट्रात मतदान घेण्यात येणार नाही. महाराष्ट्रात भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, केरळ भाजपचे नेते व्ही मुरलीधरन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होत आहे. 

Voting india

16 राज्यांपैकी महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, देहरादून आणि हिमाचल प्रदेश या १० राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याने या राज्यांत मतदान घेण्यात येणार नाही. 

दरम्यान, या निवडणुकीसाठी मतदान सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झाले असून, ४ वाजेपर्यंत मतदान चालेल. आज सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरवात होऊन त्यानंतर रात्रीपर्यंत या निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

Web Title: Political News Rajya Sabha Election Voting has been Started for 25 Seats of Rajya Sabha