...तर 2019 ला मी पंतप्रधान : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

अमित शहा एका हत्येप्रकरणात आरोपी आहेत. त्यांच्याबाबत कोणतीही विश्वासार्हता आहे, असे आता वाटत नाही. भारतातील जनता भाजप अध्यक्ष अमित शहा हे हत्येप्रकरणात आरोपी असल्याचे विसरले आहेत.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जर सर्वात मोठा पक्ष ठरला आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यास मी पंतप्रधान होईन, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. 

राहुल गांधींना 2019 साली तुम्ही पंतप्रधान होणार का, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, हे सर्व निवडणुकीच्या निकालावर आधारित आहे. जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल तर माझे उत्तर होय असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होणार नाही. इतके नाहीतर पंतप्रधान मोदींना वाराणसीतून पराभूत व्हावे लागेल. 

amit shah

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले होते.

Web Title: Political Rahul Gandhi says he will become Prime Minister if Congress emerges as largest party in 2019