माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हाती : पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : ''सत्तेचा मोह आपण समजू शकतो, पण सत्तेसाठी काँग्रेसने केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागत आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच ''काँग्रेसने केलेली प्रत्येक चूक सुधारण्याचे काम माझ्या नशिबी आले आहे. आता माझे नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात आहे'', असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आज राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी हनुमानगडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत पंतप्रधान म्हणाले, ''काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवला असता तर करतारपूर भारतापासून वेगळं होऊन पाकिस्तानात गेले नसते. सत्तेचा मोह असणे, आपण समजू शकतो. मात्र, सत्तेसाठी काँग्रेसने केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागत आहे. काँग्रेसने केलेली प्रत्येक चूक सुधारण्याचे काम माझ्या नशिबी आले आहे. तसेच माझे नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात आहेत.

दरम्यान, पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर करतारपूर कॉरिडोरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. 

Web Title: Political Statement of Prime Minister Narendra Modi on Election Issue