रिटा बहुगुणा 'दगाबाज', 'संधिसाधू'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कॉंग्रेसचे टीकास्त्र; भाजपवरही हल्ला
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये कॉंग्रेसच्या नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांना आपल्याकडे ओढून भाजपने कॉंग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसने "भाजप दगाबाजांची फौज जमा करत आहे,' असा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर रिटा बहुगुणा जोशी यांची "दगाबाज', "संधिसाधू' अशी शेलक्‍या शब्दांत संभावना केली आहे.

उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे शक्तिशाली नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या कन्या असलेल्या रिटा बहुगुणा यांनी आज औपचारिकरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला. हेमवतीनंदन बहुगुणा यांनी इंदिरा गांधींच्या काळात पक्ष सोडला होता. रिटा बहुगुणा यांचे बंधू व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा हेही काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

या पक्षबदलाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी रिटा बहुगुणा यांच्यावर कडाडून टीका केली. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासूनच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्ष फोडण्याचा आणि दगाबाज लोकांना जवळ करण्याचा कार्यक्रम राबविला आहे. रिटा बहुगुणा या इतिहासाच्या प्राध्यापक आहेत आणि त्यांनी आपल्या कुटुंबाच्या इतिहासाची (पक्ष बदल) पुनरावृत्ती केली आहे, असा टोला बब्बर यांनी लगावला.

उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी रिटा बहुगुणा संधिसाधू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, रिटा बहुगुणा यांना पराभवाची भीती वाटत असल्यामुळे त्या आधीपासूनच सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होत्या. त्यासाठी त्यांनी बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षाची दारे ठोठावली. आता भाजपमध्ये गेल्या. अशा प्रकारचे संधिसाधू नेते कोठेही टिकत नाहीत. त्या आधी समाजवादी पक्षात होत्या, नंतर कॉंग्रेसमध्ये आल्या. आता भाजपमध्ये पोचल्या. नंतर कुठे जातील हे माहीत नाही, असा टोला आझाद यांनी लगावला.

Web Title: politics by congress