विद्यार्थ्यांआडून विरोधकांचे राजकारण - पात्रा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस, डावे पक्ष व विरोधक देशभरात हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधी यांच्या ‘रि-लाँचिंग’च्या दुसऱ्याच दिवशी देशात हिंसेचे लोण कसे पसरले, असा गंभीर प्रश्‍न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज विचारला.

नवी दिल्ली - नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस, डावे पक्ष व विरोधक देशभरात हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधी यांच्या ‘रि-लाँचिंग’च्या दुसऱ्याच दिवशी देशात हिंसेचे लोण कसे पसरले, असा गंभीर प्रश्‍न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज विचारला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पात्रा म्हणाले, की खासदार असदुद्दीन ओवेसी देशातील नवे जिन्ना म्हणून कार्यरत आहेत व आमदार अमानुल्ला खान दिल्लीचा जिन्ना बनू पाहत आहेत. नेहमी बंगालीतून बोलणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी याच मुद्द्यावर हिंदीत भाषण केले, त्यामागचा उद्देश हिंसा भडकावण्याचाच होता का? विविध राजकीय पक्षांनी मतपेढीच्या क्षुद्र राजकारणासाठी आपापल्या ओवेसींना रस्त्यावर उतरविले आहे व आता ही कुप्रवृत्ती विद्यापीठे व कॉलेजांतही शिरली आहे. 

पाणी योजनांबाबत सुप्रिया सुळे काय म्हणतात पहा

राहुल गांधी यांना काँग्रेसने शनिवारी पुन्हा ‘लाँच’ केले त्याच व दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या जामियापासून लखनौच्या नदवा कॉलेजपर्यंत हिंसाचार उफाळला, या विचित्र योगायोगावरही पात्रा यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, की देशातील लोकांनी आता या काँग्रेसला मते देणे थांबविले आहे. कलम ३७० वरही या पक्षाने भावना भडकावण्याचा उद्योग केला, त्याला जनतेने साथ दिली नाही. हा पक्ष आता खालच्या पातळीवरील राजकारणावर उतरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics of opposition from students sambit patra