विरोधकांच्या एकजुटीचा पोटनिवडणुकीत विजय; भाजपला फक्त 2 जागा

गुरुवार, 31 मे 2018

गोंदीया-भंडाऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण भाजपच्या हातात असलेल्या या जागेवर कब्जा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले आहेत. तसेच उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातही भाजपला एक लोकसभा व एक विधानसभेची जागा गमवावी लागली. ​

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी आज (ता. 31) पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. पण आजचे निकाल बघता, ते भारतीय जनता पक्षासाठी आनंददायी नाहीत. केवळ पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

गोंदीया-भंडाऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण भाजपच्या हातात असलेल्या या जागेवर कब्जा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले आहेत. तसेच उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातही भाजपला एक लोकसभा व एक विधानसभेची जागा गमवावी लागली. 
   
पोटनिवडणूकीतील विजयी उमेदवार - 
उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशात 1 लोकसभा व एक विधानसभा जागांसाठी मतमोजणी झाली. कैराना येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन यांनी विजय मिळवला. तर नुरपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दोनही जागा आधी भाजपकडे होत्या, त्यामुळे हे दोन्ही विजय म्हणजे भाजपला मोठा धक्का असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निराशाजनक बाब आहे.  

महाराष्ट्र -
महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले. तर गोंदीया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले. दोनही जागांवर पूर्वी भाजपचे वर्चस्व होते. 

कर्नाटक - 
कर्नाटकातील आरआर नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मूनीराथन् यांनी भाजपला पराभूत करून 40,000 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

पंजाब - 
पंजाबच्या शाहकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला मागे टाकत काँग्रेस विजयी.

पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगालच्या महेस्थला विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विजयी.

उत्तराखंड -
उत्तराखंडच्या थराली विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्ष भारतीय जनता पक्ष पुन्हा विजयी. 

मेघालय -
मेघालयच्या अंपती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मियानी डी शेरा विजयी झाले आहेत.

बिहार -
बिहारच्या जोकीहाट विधानसभा मतदारसंघात भाजप-जेडीयु या युतीला मागे टाकत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विजयी.

केरळ -
केरळमधील चेंगनुर विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे उमेदवार विजयी. 

झारखंड -
झारखंडमधील गोमिया व सिल्ली विधानसभा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे दोनही उमेदवार विजयी.

नागालँड -
नागालँडच्या एकमेव लोकसभा मतदारसंघात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव पार्टीचे टोकेहो विजयी. 
 

Web Title: by poll elections results declared bjp wins only 2 seats