पोल्लाची सामूहिक बलात्कार प्रकरण : तामिळनाडूचं राजकारण हादरले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

पोल्लाची - "माझ्यावर अत्याचार करू नका," अशी विनंती बॉयफ्रेंड आणि त्याच्या काही मित्रांना करणाऱ्या एका तरुणीचा व्हीडिओ तामिळनाडूमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमुळे तामिळनाडूतले राजकारणाचे वातावरण तापले आहे. 

वर्तमानपत्रांमध्ये देखील तामिळनाडूत एक गँग सक्रिय असून, जी महिलांचा लैंगिक छळ करत असल्याच्या बातम्या आल्या आहेत तसेच ही टोळी महिलांना ब्लॅकमेल करत आहे. आणि या गँगशी संबंधित आरोपींवर पोल्लाची भागातल्या काही राज्यकर्त्यांचा वरदहस्त आहे अशा बातम्या येत आहेत.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीच्या भावाने पोल्लाची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणामध्ये वसंत कुमार, सबरीश, सतीश आणि थिरुनावुकारसू या चौघांना या अटक करण्यात आली होती. 

24 फेब्रुवारीला 4 जणांविरुद्ध केस दाखल करण्यात आली आणि 28 फेब्रुवारीला तिघांना अटक करण्यात आली. यापैकी थिरुनावुकारसू हा लपून बसला होता. पोलिसांनी 5 मार्चला त्याला अटक केली.

वसंत कुमार, सबरीश, सतीश आणि थिरुनावुकारसू या चौघांविरुद्ध 59/19, u/s. 354(A), 354(B), IPC r/w 66(E), IT Act 2000 आणि Tamil Nadu Women Harassment Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हीडिओविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेच्या भावावर काही संशयितांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांपैकी वसंत कुमार, सेंथील आणि नागराज या तीन जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी नागराज सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाशी संबंधित आहे, यामुळे सत्ताधारी पक्ष या केसमध्ये अडथळा आणत आहे, अशी अनेकांनी टीका केली होती. सोमवारी अण्णा द्रमुकने निवेदन प्रसिद्ध करून म्हटले की, नागराजला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

Web Title: Pollachi sexual assault triggers outrage among politicians