दिल्ली महानगरपालिकांसाठी मतदानाला प्रारंभ

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

आज 1 कोटी 30 लाखापेक्षा अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क गाजवणार आहेत. त्यासाठी 13 हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. दिल्लीतील दक्षिण आणि उत्तर महानगरपालिकेत 104 वॉर्ड आहेत. तर पूर्व दिल्लीत 64 वॉर्ड आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील तीन महानगरपालिकांसाठी आज (रविवार) सकाळी मतदानास सुरुवात झाली. आज तब्बल अडीच हजार पेक्षा अधिक उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.

आज 1 कोटी 30 लाखापेक्षा अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क गाजवणार आहेत. त्यासाठी 13 हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील दक्षिण आणि उत्तर महानगरपालिकेत 104 वॉर्ड आहेत. तर पूर्व दिल्लीत 64 वॉर्ड आहेत. यावेळी एकूण 18 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 2 हजार 537 उमेदवारांपैकी 1 हजार 51 अपक्ष उमेदवार आहेत. मतदानादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल 56 हजार पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

आप आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीत किमान पन्नास जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान "आप'मधून बाहेर पडलेले आणि स्वराज पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिले आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने यश मिळविले आहे. तर अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत "आप'ला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Web Title: polling for MCD elections begins