गोव्यातील संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा

अवित बगळे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पणजी : गोवा सरकार अखेर केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रेट्यापुढे नमले आहे. या मंडळाने गेल्या वर्षी सरकारी मालकीच्या संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा बसविण्यात यावी अशी सूचना केली होती. मात्र सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने यंदा मंडळाने कारखाना बंद करण्याचा आदेश दिला.

पणजी : गोवा सरकार अखेर केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रेट्यापुढे नमले आहे. या मंडळाने गेल्या वर्षी सरकारी मालकीच्या संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा बसविण्यात यावी अशी सूचना केली होती. मात्र सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने यंदा मंडळाने कारखाना बंद करण्याचा आदेश दिला.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या गोवा सरकारने दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी साखऱ कारखान्याच्या जल व वायू प्रदूषणावर नजर ठेवणारी आवश्यक ती यंत्रणा बसवण्यास आजपासून सुरवात केली आहे.  दिल्ली येथील नेवको इंजिनि्र्स प्रा. लि. कडुन 17 लाख 73 हजार 540 रुपयांना ही यंत्रणा विकत घेतली आहे. कंपनीला ही यंत्रणा पुरवण्याचे आदेश संजीवनीच्या व्यवस्थापनाने 30 नोव्हेंबर रोजी दिले होते आणि कंपनीनेही 3 रोजी ही यंत्रणा रवाना केली होती.

ही यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक ते पायाचे काम करण्यात आले आहे. या यंत्रणेची जुळणी करावी लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ अभियंते आज गोव्यात पोचले  आहेत. त्यांनी जुळणी केल्यावर पुढील तीन दिवसात ती यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यानंतर यंत्रणेची चाचणी घेऊन ती यंत्रणा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळाला जोडावी लागणार आहे. तसे केल्यानंतरच मंडळ आपला पूर्वीचा आदेश मागे घेणार आहे.

मंडळाचा कारखाना बंदीचा आदेश आल्यानंतर व्यवस्थापनाकडून कारखाना सुरु करण्यासाठी मोठे प्रयत्न झाले नसल्याचेही समोर आले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखभालीचे काम सोपवावे., यंत्रणा बसवण्याची हमी देण्यासाठी बॅंक हमी देत आहोत अशी भूमिका कंपनीच्या व्यवस्थापनाला घेणे शक्य होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसा पत्रव्यवहार करणे आवश्यक होते. तसे झाल्यास कदाचित संजीवनी साखऱ कारखाना वेळेत सुरु करता आला असता, अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: pollution measurement machine in sanjivani sugar factory in goa