अडीच लाख रोजगार, मोफत स्कूटी; पुदुच्चेरीसाठी भाजपचा जाहीरनामा

BJP's manifesto
BJP's manifesto

पुदुच्चेरी - भ्रष्टाचारमुक्त शासन, अडीच लाख रोजगारांची निर्मिती, मच्छीमारांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाह्य आणि उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याचे आश्‍वासन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेे. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीनिमित्त आज भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. अर्थमंत्री आणि भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनी जाहीरनामा मांडला. यादरम्यान केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल आणि गिरिराज सिंहही उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुदुच्चेरीत ३० जागांवर एकाच टप्प्यांत ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. निकाल दोन मे रोजी जाहीर होणार आहेत. पुदुच्चेरी निवडणुकीसाठी भाजपने अण्णाद्रमुक आणि ऑल इंडिया एनआर कॉंग्रेससमवेत आघाडी केली आहे. तर कॉंग्रेस द्रमुकसमवेत भाजपशी मुकाबला करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० मार्च रोजी सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाजपचा जाहीरनामा हा ‘न्याय’ देणारा आहे. जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी जाहीरनाम्याची रचना केली आहे. आम्ही एसी खोलीत बसून जाहीरनामा तयार केलेला नाही. यासाठी जनतेची मते मागवली होती.  देशातील जनता मोदींनी दिलेले आश्‍वासन पूर्ण होताना पाहत आहेत. दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांना प्राधान्य दिले आहे. याशिवाय शेतकरी, मच्छीमार यांचीही दखल घेतली आहे. 

भाजपचा जाहीरनामा

  • केजी ते पीजीपर्यंत विद्यार्थिंनीना मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण
  • महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत लॅपटॉप तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांना स्कूटी.
  • महिलांना मोफत आरोग्य सेवा 
  • सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी येथे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन बसवणार.
  • पुदुच्चेरी शालेय शिक्षण मंडळाची स्थापन करणार.
  • पुदुच्चेरी युवक कल्याण आणि क्रीडा मंडळाची स्थापना.
  • खासगी आणि सरकारी सेवेत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com