गांधींच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या पूजा पांडेला अटक

pooja Pandey
pooja Pandey

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिवशी त्यांच्या पुतळ्याला गोळ्या मारून पेढे वाटणाऱ्या पूजा पांड्ये या महिलेला आज (ता. 6) नोएडा येथे अटक करण्यात आली. पूजा पांड्ये व तिचा पती अशोक पांड्ये या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पूजा पांडे ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे. 

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 30 जानेवारील पूजा पांडे व तिच्या सहकाऱ्यांनी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारून त्यांचा अवमान केला होता. तसेच पेढे वाटले होते. या कृत्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. तसेच या कृतीला जोरदार विरोधही झाला. पूजा पांड्ये व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्याची मागणीही झाली होती.

गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारण्याचे कृत्य पूजा पांडेने घडवून आणले होते. याचा व्हिडिओही देशभरात पसरला होता. पुतळ्याला गोळ्या मारल्यानंतर हा पुतळा पेटवण्यात आला होता, तसेच नथुरामच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com