कानपूरजवळ पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे घसरले; 25 जण जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, युद्धपातळीवर मदतकार्य केले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मदतीसाठी 1072, 9454403738, 9454401463, 9454401075, 9454400384 आणि 0512-23333111/112/113 हे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज (शनिवार) पहाटे हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले आहेत. 

रेल्वे अधिकारी अमित मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या रुमा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. पहाटे एकच्या सुमारास हावडाहून दिल्लीकडे येत असलेल्या पूर्वा एक्सप्रेसचे 12 डबे घसरले. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले असून, यातील 14 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, युद्धपातळीवर मदतकार्य केले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मदतीसाठी 1072, 9454403738, 9454401463, 9454401075, 9454400384 आणि 0512-23333111/112/113 हे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Poorva Express accident 25 people sustain minor injuries after coaches of New Delhi-Howrah train overturn near Kanpur