पॉर्न फिल्ममुळे बालिकांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ : गृहमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

''बालिकांवर होणाऱ्या बलात्कार आणि विनयभंगासारख्या घटना या पॉर्न फिल्ममुळे वाढत आहेत, असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे राज्यात पॉर्न फिल्मवर बंदी आणण्याबाबत विचार सुरु करण्यात आला असून, आम्ही केंद्र सरकारला याबाबत शिफारस करणार आहोत''.

-  भूपेंद्र सिंग, गृहमंत्री, मध्यप्रदेश

नवी दिल्ली : बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत. त्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी बालिकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे पॉर्न फिल्म असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पॉर्नोग्राफीच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

Madhya pradesh assembly

बालिकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांवर सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. पॉर्न फिल्ममुळे बालिकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप केला. या अशा प्रकारच्या पॉर्न फिल्ममुळे बालिकांवर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी पॉर्नोग्राफीवर राज्यात बंदी आणण्याबाबत आम्ही केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. 

''बालिकांवर होणाऱ्या बलात्कार आणि विनयभंगासारख्या घटना या पॉर्न फिल्ममुळे वाढत आहेत, असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे राज्यात पॉर्न फिल्मवर बंदी आणण्याबाबत विचार सुरु करण्यात आला असून, आम्ही केंद्र सरकारला याबाबत शिफारस करणार आहोत'', असे सिंग म्हणाले.  

Web Title: Porn for increase in child rape cases says Home Minister Bhupendra Singh