पाटणा रेल्वे स्थानकावर पॉर्न साईट ब्लॉक

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वाय-फायचा वापर केला जात असून, या रेल्वे स्थानकावरून पॉर्न साइट सर्वाधिक पाहिल्या जात असल्याची माहिती समोर आली होती.

पाटणा - मोफत वाय-फाय सेवा असल्याने पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक पॉर्न साईट बघितल्या जात असल्याचे समोर आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने पॉर्न साईट ब्लॉक करण्यास सुरवात केली आहे. 

देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वाय-फायचा वापर केला जात असून, या रेल्वे स्थानकावरून पॉर्न साइट सर्वाधिक पाहिल्या जात असल्याची माहिती समोर आली होती. देशातील 23 रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाटणा रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक पॉर्न सर्च केले जाते. पॉर्न व्हिडिओ व छायाचित्रे मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केल्या जातात, असे उघड झाल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

रेल्वेचे अधिकारी अरविंद रजक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न साईट ब्लॉक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार काम सुरु आहे. रेल्वेगाड्यांबाबत माहिती मिळण्यासाठी वाय-फाय सेवा सुरु करण्यात आली होती. पण, नागरिकांकडून याचा गैरवापर करण्यात येत आहे. 

Web Title: porn sites blocked for wi-fi users at patna junction