esakal | Positive Story : फेब्रुवारीत येणार भारतीय कोरोना लस, नोव्हेंबरमध्ये अखेरची चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine main 1.jpg

भारतात या लशीच्या चाचणीमध्ये 25 हजारहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांना 28 दिवसांच्या अंतराने लशीचा डोस दिला जाईल.

Positive Story : फेब्रुवारीत येणार भारतीय कोरोना लस, नोव्हेंबरमध्ये अखेरची चाचणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोनामुळे त्रस्त भारतीयांसाठी दिलासादायक वृत्त आहे. भारतीय कोरोना लस 'कोव्हॅक्सिन'ची शेवटची चाचणी पुढील महिन्यात सुरु होऊ शकते. भारत बायोटेकला औषध नियामकाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस परवानगी दिली आहे. डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी बैठक घेतली होती. या बैठकीतच या लशीच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. डीसीजीआयने प्रोटोकॉलमध्ये छोटीशी दुरुस्ती केली आहे. भारतात या लशीच्या चाचणीमध्ये 25 हजारहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांना 28 दिवसांच्या अंतराने लशीचा डोस दिला जाईल. सुरुवातीच्या चाचण्यातील लसीच्या निकालांमुळे आशा निर्माण झाल्या आहेत. कोव्हॅक्सिन पहिली स्वदेशी कोरोना विषाणू लस आहे. ही लस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयएमसीआर) सहाय्याने तयार करण्यात आली आहे. 

या समितीची एक बैठक 5 ऑक्टोबर रोजी झाली होती. यामध्ये कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील प्रोटोकॉल पुन्हा देण्यास सांगितले होते. समितीच्या मते तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासाची रचना समाधानकारक होती. परंतु, त्याची सुरुवात दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षा आणि रोगप्रतिकारक डेटामध्ये योग्य डोस निश्चितीनंतर असायला हवी होती. 

हेही वाचा- आता भारतात सर्वांना प्रवेश पण...

कोव्हॅक्सिनची अखेरची चाचणी दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पंजाब आणि आसाममध्ये करण्याची भारत बायोटेकची योजना आहे. कंपनी फेब्रुवारीपर्यंत अंतिम चाचणीचे निकाल येण्याची अपेक्षा करत आहे. त्यानंतर परवानगी आणि मार्केटिंगच्या मंजुरीसाठी अर्ज केला जाईल. 

भारत बायोटेकने आपल्या कोविड लशीत Alhydroxiquim-II चे नाव अजुवंट असे लिहिले आहे. ही लस रोग प्रतिकारशक्ती वाढवेल आणि त्यामुळे दीर्घ काळापर्यंत कोरोनापासून सुरक्षा मिळेल. अजुवंटमुळे लशीची कार्यक्षमता वाढते. ही लस घेतल्यानंतर शरीरात जास्त अँटीबॉडीज तयार होतात आणि दीर्घकाळापर्यंत प्रतिकारशक्ती मिळते. 

हेही वाचा- Bihar Election : बिहारला मोफत कोरोना लस, 19 लाख रोजगार; भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

कोव्हॅक्सिनशिवाय भारतात आणखी दोन कोरोना लशीची चाचणी होत आहे. सीरम इन्स्टि्यूट ऑफ इडिया ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रोजेनकोची या लशीत भागीदारी आहे. त्यांनी आपल्या लशीला 'कोविशील्ड' असे नाव दिले आहे. त्याचबरोबर जायडस कॅडिला ZyCov-D नावाने लस बनवत आहे. इतर काही कंपन्याही संशोधन करत आहेत. 
 

loading image
go to top