दोन दिवसांत सदनिकेचा ताबा द्या

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

वादग्रस्त पार्श्‍वनाथ बिल्डर्सला न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली - केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना गुरगावमधील प्रकल्पातील सदनिकेचा ताबा दोन दिवसांत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज संबंधित बांधकाम व्यवसायिकाला दिले आहेत. राठोड यांनी 2006मध्ये ही सदनिका खरेदी केली होती. मात्र, 70 लाख रुपये देऊनही पार्श्वनाथ डेव्हलपर्सकडून अद्यापपर्यंत ही सदनिका राठोड यांना मिळू शकलेली नाही.

राठोड यांनी बांधकाम व्यावसायिकाला यापुढे अधिक पैसे देऊ नयेत, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तसेच, पुढील दोन दिवसांत राठोड यांना सदनिकेचा ताबा देण्यात यावा, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. सदनिकेचा ताबा देण्यास उशीर केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकाला किती दंड करायचा, याबाबतचा निर्णय पुढील काळात घेतला जाईल, असे खंडपीठाने सांगितले.

बांधकाम व्यावसायिकाने 2008-09मध्ये सदनिकेचा ताबा राठोड यांना देणे अपेक्षित होते. मूळ रक्कम, त्यावरील व्याज आणि नुकसान भरपाईची रक्कम राठोड यांना द्यावी, असा आदेश चालू वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाने "पार्श्वनाथ'ला दिला होता.

वादग्रस्त ठरलेल्या "पार्श्वनाथ'कडून जमा करण्यात आलेले 12 कोटी रुपये संबंधित प्रकल्पातील 70 सदनिका खरेदीदारांना परत करण्याचा आदेशही न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. तसेच, 10 डिसेंबरपर्यंत "पार्श्वनाथ'ने आणखी 10 कोटी रुपये न्यायालयात जमा करावेत, असेही न्यायालयाने सांगितले आहेत.

Web Title: possesion in two days flat by court order