चोक्‍सीच्या जप्त मालमत्तांचा ताबा 'ईडी'कडेच राहणार 

The possession of Choksi Assets will remain with ED
The possession of Choksi Assets will remain with ED

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आलेल्या, भारतातून पलायन केलेला हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्‍सी आणि त्याच्याशी संबंधित कंपनीच्या मालकीच्या 41 मालमत्ता या पैशांची अफरातफर करून मिळविलेल्या असून, त्यांचा ताबा "ईडी'कडे ठेवण्यात यावा, असा निर्णय आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आला. 

आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी चोक्‍सीचे मुंबईतील 15 फ्लॅट व 17 कार्यालये, कोलकत्यातील एक मॉल, अलिबागमधील चार एकरचे फार्महाउस, तसेच, नाशिक, नागपूर, पनवेलसह तमिळनाडूतील विल्लूपुरम येथील एकूण 231 एकर जमीन "ईडी'ने जप्त केली आहे. फेब्रुवारीमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. सुमारे एक हजार 210 कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुंबईतील शाखेतून सुमारे दोन अब्ज डॉलरचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी चोक्‍सीच्या या मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

चोक्‍सीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांशी या मालमत्तांचा थेट संबंध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या चोक्‍सीच्या मालमत्तेमध्ये हैदराबादमधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची 170 एकर जमिनीचाही समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com