देशात पेट्रोल ५० रूपयांवर येणार?; दोघांची भांडणं भारताचा फायदा

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 मार्च 2020

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती ३१ टक्क्यापार्यंत खाली घसरल्या आहेत. सौदी अरेबियाने पेट्रोलच्या किंमतीत केलेली कपात यासाठी कारणीभूत ठरली. रशियाने उत्पादन कमी करण्याचे मान्य केले नाही, त्यामुळे सौदीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते व या दोन्ही देशांच्या भांडणाचा फायदा भारताला होऊ शकतो. 

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे भारतीय नागरिक त्रस्त झाले असून आता त्यांना दिलासा मिळणार आहे. देशातील पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची शक्यता असून त्या थेट ५० रूपये प्रति लिटरवर येणार आसल्याची चर्चा आहे. सौदी अरेबिया आणि रशिया या दोन देशांमध्ये कच्च्या तेलांच्या किंमतीवरून सुरू झालेल्या युद्धाचा फायदा होऊन भारतातील पेट्रोल दर कमी होऊ शकतात. सरकारचा आयात खर्च कमी होऊन भारताला स्वस्त दरात तेल मिळण्याची शक्यता आहे. 

'त्या' पोलिस अधिकाऱ्यांनी आश्रमातील मुलांना दाखविले पॉर्न व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती ३१ टक्क्यापार्यंत खाली घसरल्या आहेत. सौदी अरेबियाने पेट्रोलच्या किंमतीत केलेली कपात यासाठी कारणीभूत ठरली. रशियाने उत्पादन कमी करण्याचे मान्य केले नाही, त्यामुळे सौदीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते व या दोन्ही देशांच्या भांडणाचा फायदा भारताला होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कच्च्या तेलाचे दर ३१ टक्क्याने खाली आल्याने आयात शुल्कात घट होईल व भारतात पेट्रोल ५० रूपयांवर येईल. सध्या देशात पेट्रोलचा ७९ रूपये इतका आहे.  भारतीय बाजारात कच्च्या तेलाच्या एका बॅरेलची किंमत 47.92 डॉलर इतकी आहे. म्हणजेच सध्याच्या दरानुसार एक क्रूड बास्केट 3530 रुपयांपर्यंत पडेल. यात 30 टक्के दर कमी झाल्यास बॅरेलची किंमतही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वेळी क्रूड बास्केटची आयात करताना त्याचा दर 2470 रुपये असू शकतो. याचा फायदा सर्वसामन्यांपर्यंत पोहोचवायचा ठरला तर पेट्रोलचे दर 50 रुपयांपर्यंत कमी होतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility to fall petrol prices in India till 50 rs