गोव्यात मंत्रिपदासाठी अनेक इच्छूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्यात दाखल झाल्यानंतरच त्यांच्यासमोर मंत्रिमंडळातील फेरबदलाचे आव्हान असेल. भाजपमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यातील उपसभापती मायकल लोबो यांनी आजारी आणि अकार्यक्षम मंत्र्यांना वगळा अशी जाहीर मागणी केली आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्यात दाखल झाल्यानंतरच त्यांच्यासमोर मंत्रिमंडळातील फेरबदलाचे आव्हान असेल. भाजपमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यातील उपसभापती मायकल लोबो यांनी आजारी आणि अकार्यक्षम मंत्र्यांना वगळा अशी जाहीर मागणी केली आहे.

मध्यंतरी महाराष्ट्र गोमंतकचेतिन्ही आमदार भाजपमध्ये सहभागी करून सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा एक विचार पुढे आला होता. मात्र मगोच्या अन्य नेत्यांनी विलीनीकरणाविरोधी जाहीर भूमिका घेतल्याने तो विषय मागे पडला. तरी तो विषय़ पूर्णतः बाजूला पडलेला नाही. आज ढवळीकर यांना भाजपच्या नेत्यांनी तातडीने दिल्लीत बोलावून घेतल्यावरून तो विषय़ चर्चेत आहे असे मानण्यास जागा निर्माण झाली आहे.

राज्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे पक्षाघाताचा झटका आल्यापासून गेले १२ दिवस मु्ंबईच्या कोकीलाबेन इस्पितळात कोमासदृश्य स्थितीत आहेत. नगरविकासमंत्री अॅड फ्रांसिस डिसोझा आजारी असून ते दुसऱ्याच्या मदतीशिवाय चालू शकत नाहीत. कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी दोन महिन्यांपूर्वी बसलेल्या पक्षाघाताच्या धक्क्यानंतर ते एकदाच सार्वजनिक कार्यक्रमात आले आहेत. ते विश्रांती घेत आहेत. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्याविरोधात वीज घोटाळाप्रकरणाची सुनावणी उद्यापासून सुरु होणार आ्हे.

त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदलाचा आग्रह आता धरला जात आहे. विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत आणि उपसभापती मायकल लोबो यांचे नाव सध्या मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. 

Web Title: post of goa ministers many wishes