Delhi Elections : 'पराजय से हम निराश नहीं होते'; भाजपने मानली निकालापूर्वीच मानली हार?

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

बहुमत आपलाच मिळेल असे चित्र सकाळपासूनच दिसत आहे. अशातच दिल्ली भाजप कार्यालयाबाहेर लागलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरवरुन भाजपने निकालापूर्वीच पराभव स्विकारला आहे की काय, अशा चर्चा होत आहेत. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरवात झाली असून आम आदमी पक्ष ५५ जागांनी आघाडीवर आहे. भाजपला जवळपास १५ जागांवर आघाडी मिळालेली असून हा आकडा आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमत आपलाच मिळेल असे चित्र सकाळपासूनच दिसत आहे. अशातच दिल्ली भाजप कार्यालयाबाहेर लागलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरवरुन भाजपने निकालापूर्वीच पराभव स्विकारला आहे की काय, अशा चर्चा होत आहेत. 

Delhi Elections : 'भाजप ५५ जागांवर जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका'

सध्या दिल्लीच्या भाजप कार्यालयात लागलेला पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेतोय आणि सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या पोस्टरवर 'विजय से हम अहंकारी नहीं होते और पराजय से हम निराश नहीं होते' असं लिहिलं आहे. तर या पोस्टरवर गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो आहे. हे पोस्टर भाजपच्या दिल्लीतील पदाधिकाऱ्यांनी लावला असून दुसरीकडे भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी मात्र, विजयाचा दावा केला आहे. पण या पोस्टरवरून अशी चर्चा होत आहे की, भाजपने निकालापूर्वीच हार मानली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image

मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील कल हे आपच्या बाजूने आहेत असा सवाल केल्यानंतर मनोज तिवारी यांनी 'मी नर्व्हस नाही, भाजपसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपच्या कार्यालयात जल्लोषाची तयारी सुरू आहे. भाजप आज दिल्ली सरकामध्ये येईल. भाजप ५५ जागांवर जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका' सांगितले. तिवारी ईशान्य दिल्लीचे खासदार आहेत. 

Delhi Elections:'आप'ची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने; पक्षाचं कार्यालय सजलं, जल्लोषाची तयारी

सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poster installed at BJP office gets viral on Social media in Delhi Elections