व्हॉट्सअॅपवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट ; अॅडमिनला अटक

अमृत वेताळ
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अक्षय राजेंद्र अलगोंडीकर (वय 20, रा. महावीर नगर उद्यमबाग) असे अटक करण्यात आलेल्या ग्रुप अॅडमिनचे नाव आहे. अक्षय याने टॉप मुजिक ओन्ली नावाने ग्रुप तयार केला आहे.

बेळगाव : व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यामुळे बेळगावातील 'टॉप मुजिक ओन्ली ग्रुप'च्या अॅडमिनल शहर गुन्हे विभाग (सीसीबी) पोलिसांना अटक केली आहे. 

अक्षय राजेंद्र अलगोंडीकर (वय 20, रा. महावीर नगर उद्यमबाग) असे अटक करण्यात आलेल्या ग्रुप अॅडमिनचे नाव आहे. अक्षय याने टॉप मुजिक ओन्ली नावाने ग्रुप तयार केला आहे. युट्यूबवर त्याने या ग्रुपची लिंक शेअर केली होती. त्यामुळे कोणीही या ग्रुपपचा सभासद होऊ शकतो. लिंकद्वारे ग्रुपमध्ये प्लस 92 नंबर असलेले पाकिस्तानचे दोघेजण सभासद झाले होते. त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडाचेदेखील काही सभासद आहेत. अलीकडेच पाकिस्तानच्या सभासदानी ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून ते ग्रुपमधून लेफ्ट झाले होते. त्यानंतर अॅडमिन अक्षयने त्यांना पुन्हा ग्रुपमध्ये पुन्हा अॅड केले. तरीदेखील ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकून लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

ग्रुपवरील आक्षेपार्ह मजकुराचा स्क्रीनशॉट घेउन अक्षयने ते अन्य ग्रुपवर शेअर केले होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे शहर गुन्हे विभागाचे (सीसीबी) पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर याने स्वतः गुन्हा दाखल करून ग्रुपचा अॅडमिन असलेल्या अक्षय या तरुणाला अटक केली. तो उधमबाग येथील एका कारखान्यात कामाला आहे.

Web Title: Posts that hurt religious sentiment on the WhatsApp group Admin arrested