कळंगुट किनाऱ्याकडील रस्ते खड्डेमय; खड्ड्यांत रोपटी लावून लोकांचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सरकारकडून तसेच स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याकडून हे खड्डे बुजविण्यास कोणतेच प्रयत्न होत नसल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या कळंगुट समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

कळंगुट (गोवा) - गोव्यातील महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहनांना तसेच पादचाऱ्यांना धोकादायक बनले आहेत. सरकारकडून तसेच स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याकडून हे खड्डे बुजविण्यास कोणतेच प्रयत्न होत नसल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या कळंगुट समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कळंगुट मतदारसंघातील नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये रोपटी लावून त्याचा निषेध व्यक्त केला. ही रोपटी सिंकेरी ते कळंगुट, हडफडे ते नागोआ या भागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये लावण्यात आली.
 

kalangut goa

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Pot Hole Issues At Kalangut Goa