गुजरातमध्ये भाजपची ताकद वाढणार; अल्पेश ठाकोर यांचा प्रवेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

अहमदाबाद : गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तीन युवा नेत्यांनी भाजपच्या अडचणी वाढविल्या होत्या. 

कोण आहेत अल्पेश ठाकोर

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पेश ठाकोर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर ते काँग्रेसच्याच तिकिटावर विजयी झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमधील नेतेमंडळींवर नाराज होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदरकीचा राजीनामा दिला होता. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power of BJP will be Increases in Gujarat Alpesh Thakor enter in BJP