सत्तालोभी 'आप'ने दिल्लीकरांना लुटले : भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले, "आम आदमी पक्षाचे सरकार केवळ सत्तालोभी आहे. दिल्लीच्य नागरिकांनी मोठ्या आशेने "आप'ला बहुमत दिले. मात्र त्या बदल्यात त्यांनी नागरिकांना लुटले. पाणी टंचाईमुळे दिल्लीतील नागरिक अद्यापही त्रस्त आहेत आणि "आप'ने दिल्लीबाहे प्रसिद्धीसाठी 97 कोटी रुपये खर्च केले.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज आम आदमी पक्षाला सत्तालोभी असल्याचे संबोधत त्यांनी दिल्लीकरांना लुटल्याचा आरोप केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले, "आम आदमी पक्षाचे सरकार केवळ सत्तालोभी आहे. दिल्लीच्य नागरिकांनी मोठ्या आशेने "आप'ला बहुमत दिले. मात्र त्या बदल्यात त्यांनी नागरिकांना लुटले. पाणी टंचाईमुळे दिल्लीतील नागरिक अद्यापही त्रस्त आहेत आणि "आप'ने दिल्लीबाहे प्रसिद्धीसाठी 97 कोटी रुपये खर्च केले.' जनतेच्या पैशाचा गैरवापर करण्याच्या प्रकारावरून भाजप नेते आर. पी. सिंह यांनीही "आप'वर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "आम आदमी पक्षाच्या सरकारने कर्मचारी कल्याणासाठी इमारती उभारणीसाठी असलेला 90 कोटी रुपयांचा खर्च खाजगी लाभासाठी खर्च केला. त्यांनी तो पैसा इतर राज्यात वापरला. यावर सर्वोच्च न्यायालयात तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून आम्हाला आशा आहे की हा पैसा "आप'कडून वसूल केला जाईल.'

एप्रिलमध्ये दिल्ली महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेसमोर स्वच्छता आणि आरोग्य या दोन मोठ्या समस्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दिल्लीवासियांना अवास्तव आश्‍वासने देत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात येत आहे.

Web Title: 'Power greedy' AAP has looted citizens of Delhi : BJP