सत्ताहीन मायावतींची अस्तित्वासाठी धडपड : भाजप

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (मंगळवार) सहारनपूर येथे भेट दिली. या पार्श्‍वभूमीवर सत्ताहीन मायावती अस्तित्वासाठी धडपड करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (मंगळवार) सहारनपूर येथे भेट दिली. या पार्श्‍वभूमीवर सत्ताहीन मायावती अस्तित्वासाठी धडपड करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी मायावतींवर टीका केली. ते म्हणाले, "मायावती या सत्ताहीन आहेत. त्यांनी आज सहारनपूरला भेट दिली. त्या दलितांसाठी काहीतरी करण्याऐवजी केवळ नक्राश्रू ढाळत आहेत.' शुक्रवारी सहारनपूर येथे ठाकूर समुदायाने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीला दलितांनी विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटात झालेल्या हाणामारी झाली होती. त्यामध्ये एक जण ठार तर 15 जण जखमी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर मायावती सहारपूरच्या दौऱ्याला जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टरने सहारनपूरचा दौरा करण्याची मायावती यांची मागणी मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य केली.

या पार्श्‍वभूमीवर मायावती यांनी रस्त्यावरून प्रवास करत सहारनपूरला भेट दिली. "माझ्या सहारनपूर दौऱ्यादरम्यान मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारची असेल', असा इशारा मायवतींनी दिला होता. यामुळे सहारनपूरला मोठी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

Web Title: 'Powerless' Mayawati facing identity crisis: BJP