साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्ली : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, संसदेमधील या समितीमध्ये एकूण 21 सदस्यांची ही समिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत.

प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता.

यावेळी अनेक जणांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल देखील  प्रज्ञा ठाकूर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे देखील त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. प्रज्ञा ठाकूर या अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Thakur nominated to Parliamentary panel on defence