कर्नाटकात भाजप करणार राजकीय भूकंप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

बंगळूर - डिसेंबर अखेरपर्यंत कर्नाटकात काहीही होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. एकीकडे राज्यातील काँग्रेस-धजद युती सरकारचे पतन करण्यासाठी ऑपरेशन कमळची चर्चा सुरू असतानाच मंत्री जावडेकर यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जावडेकर भाजपचे कर्नाटकातील निवडणूक प्रचार समिती प्रमुख आहेत.

बंगळूर - डिसेंबर अखेरपर्यंत कर्नाटकात काहीही होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. एकीकडे राज्यातील काँग्रेस-धजद युती सरकारचे पतन करण्यासाठी ऑपरेशन कमळची चर्चा सुरू असतानाच मंत्री जावडेकर यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जावडेकर भाजपचे कर्नाटकातील निवडणूक प्रचार समिती प्रमुख आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा गेल्या चार दिवसांपासून केरळमध्ये विश्रांतीच्या नावावरून गुप्तपणे जोरदार हालचाली करीत असल्याचे वृत्त आहे, तर दुसरीकडे भाजप नेते श्रीरामलू यांच्या स्वीय साहाय्यकाने दुबईतील एका उद्योजकाशी दूरवाणीवर ऑपरेशन कमळबाबत चर्चा केल्याचा व्हिडिओ उघड झाला. त्यातच आता मंत्री जावडेकर यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे.

काँग्रेस-धजद युती सरकारने कोणतेच विकास कार्य केलेले नाही, यापुढेही करण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे युती सरकारमध्ये धमाका उडणार याची शंभर टक्के खात्री आहे. परंतु हा धमाका केव्हा व कसा उडणार हे मी सांगणार नाही. बी. एस. येडियुरप्पा हेच यावर भाष्य करतील, असे सांगून प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात बाँब टाकला. 

अलीकडच्‍या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेस व धजद कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला नव्हता. आम्ही ऑपरेशन कमळ करण्याची गरजच नाही. काय घडते याची थोडी प्रतीक्षा करून तुम्हीच पाहा, असे त्यांनी सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

सरकार भक्कम : मुख्यमंत्री
राज्यात सरकार सुस्थितीत व भक्कम आहे. कोणी काहीही सांगितले तरी राजकीय भूकंप वगैरे होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केंद्राय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी (ता.५) विधानसौधमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मंत्री जावडेकर यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या वक्तव्यावर प्रतििक्रया देण्याची गरज नाही. प्रतििक्रया देण्याच्या पात्रतेचा हा विषय नाही. गेल्या सहा महिन्यांपासून अशाप्रकारचा धमाका ते उडवतच आहेत, परंतु तसे काही झाले का? सरकार स्थिर असून तसेच राहणार आहे.’

Web Title: Prakash Javdekar comment