राजीव गांधीनीसुद्धा विरोधकांना विंचू म्हटलेले आहे- जावडेकर

राजीव गांधीनीसुद्धा विरोधकांना विंचू म्हटलेले आहे- जावडेकर

नवी दिल्ली- राजीव गांधीसुद्धा 1984 मध्ये विरोधकांना विंचू असे म्हटलेले आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान आणि शिवलिंगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असेही जावडेकर म्हटले आहेत.

काँग्रेस अप्रत्यक्षरित्या माओवाद्यांना समर्थन करत असल्याचा आरोपही जावडेकरांनी यावेळी केला. तसेच, केंद्र आणि छत्तीसगडच्या भाजपा सरकार येत्या काही वर्षांत नक्षलवादाची समस्या संपवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जेव्हा छत्तीसगडची स्थापना झाली, तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. नक्षलवाद परमोच्च स्तरावर होता. आता नक्षलवाद्यांचे नियंत्रण असलेल्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी एकदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील नेत्याच्या वक्तव्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहेत, ज्याला हटवताही येत नाही आणि चपलेनेही ठेचता येत नाही. या विंचवाला हात लावला, तर तो दंश करण्याचा धोका आहे, असे मत संघातील एका बड्या नेत्याने एका पत्रकाराशी खासगीत बोलताना व्यक्त केल्याचे थरूर यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com